Mahagenco Syllabus Technician 3 | अभ्यास टिप्स
नमस्कार मित्रांनो,
महाजनकोत (Mahagenco) विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. भरपूर उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत. आता पुढील टप्प्यासाठी तयारी सुरू ठेवा – अभ्यासक्रम, पूर्व परीक्षा, आणि प्रवेशपत्राबाबत लवकरच माहिती येण्याची शक्यता आहे.पण आता प्रश्न येतो – "अभ्यासक्रम काय आहे?" आणि "तयारी कशी करायची?"तर काळजी करू नका! मी तुम्हाला सगळं एकदम सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे.
सगळे मुल ITI होल्डर आहे. काही मुल इंजिनिअरिंग वाले पण आहेत.
ITI नंतरची पहिलीच मोठी संधी – Mahagenco परीक्षा!
मित्रांनो, बरेच उमेदवार ITI झाल्यानंतर Mahagenco Technician-3 ही त्यांची पहिलीच मोठी स्पर्धा परीक्षा
असते. त्यामुळे नैसर्गिकच आहे की मनात थोडी भीती, टेंशन आणि गोंधळ असतो. बऱ्याचजणांना वाटतं की, "या परीक्षेचा अभ्यासक्रम खूप अवघड
आहे!"
पण मी तुम्हाला
खात्रीने सांगतो – असंच काही नाही!
होय, परीक्षा महत्त्वाची आहे, पण जर तुम्ही नियमित आणि शिस्तबद्ध
पद्धतीने अभ्यास केला, तर नक्कीच यश मिळवता येतं.
अभ्यासक्रम अवघड नाही – पद्धत योग्य हवी!"
तुम्हाला फक्त
अभ्यासक्रम समजून घ्यायचा आहे. एकदा का अभ्यासक्रम डोळ्यासमोर ठेवलात, की अभ्यासाचं प्लॅनिंग सोपं होतं.
प्रत्येक
विषयासाठी दिवस ठरवा. सुरुवातीला थोडा वेळ लागेल, पण जसजसा सराव वाढेल, आत्मविश्वाससुद्धा वाढेल.
रेगुलर अभ्यास – यशाची गुरुकिल्ली!"
दररोज थोडा वेळ
ठरवून अभ्यास करा. एकाच दिवशी खूप अभ्यास करून थांबू नका. सतत थोडा-थोडा सराव
केल्याने डोक्यात concepts पक्के होतात.
"आज नाही तर उद्या" हे विचार बाजूला
ठेवा – आजपासून सुरुवात करा. कारण छोटं पाऊलसुद्धा यशाच्या दिशेने जातं.
प्रयत्न थांबवू नका – जिंकणं तुमच्याच हातात आहे!"
तुम्ही म्हणाल, "मी village मधून आहे, मला english कमी समजतं, मी पहिल्यांदाच परीक्षा देतोय…" –
मित्रांनो, हे सगळं हरकत नाही. "प्रयत्न हेच
यशाचं खरं इंधन आहे – जो थांबत नाही, तोच पुढे जातो." प्रयत्न करणार्याची कधीच हार होत नाही.
प्रत्येक चांगल्या
गोष्टीसाठी वेळ लागतो, पण जो थांबत नाही, तोच पुढे जातो.
Mahagenco Technician-3 अभ्यासासाठी योग्य मार्गदर्शन
Mahagenco Technician-3 चा फॉर्म तुमच्यापैकी अनेकांनी भरला
असेल. फॉर्म भरताना तुमच्याकडून सर्व माहिती घेतली गेली असेल आणि फॉर्मची प्रिंट
सुद्धा तुम्हाला मिळाली असेल. आता पुढचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे अभ्यासाची तयारी.
बर्याच जणांना
प्रश्न पडतो, "आता अभ्यासक्रम काय आहे?"
काहींना घाई असते
– लवकर अभ्यास सुरु करायचा असतो. प्रश्नपत्रिका आणि उदाहरणे सोडून तयारी करा.
महागेन्कोच्या Technician-3 च्या प्रश्नपत्रिकेची पूर्वीची चाचणी
घ्या आणि त्यावर आधारीत अभ्यास करा. अभ्यास करताना प्रत्येक प्रश्न समजून
घ्या आणि मगच सोडवा. कारण जेव्हा तुम्ही प्रश्न समजून सोडवता, तेव्हा तुमचा आत्मविश्वास आणि उत्साह
दोन्ही वाढतो. त्यामुळे "सराव" आणि "समजून घेणं" हे दोन्ही
महत्वाचे आहेत.
तुम्ही जर एकटेच
घरी अभ्यास करत असाल, तर थोडा वेळ लागतो प्रत्येक topic चं definition आणि नियम आधी समजून घ्या. म्हणून माझा एक सल्ला आहे – शक्य असल्यास जवळच्या ठिकाणी
कुठलाही असा क्लास जॉईन करा, जिथे गणित आणि
बुद्धिमत्ता चाचणी नीट शिकवली जाते. कधी कधी एक चांगला मार्गदर्शक, कोचिंग, किंवा अभ्यासक्रम खरेदी करायला थोडा खर्च येतो, पण त्यातून मिळणारी योग्य दिशा, वेळेची बचत आणि योग्य सखोल माहिती यामुळे
खूप फायदा होतो. क्लास जॉईन केल्यावर शक्य असल्यास एखादी अभ्यासिका सुद्धा जॉईन
करा. घरी अभ्यास करताना खूप व्यत्यय येतात – घरकाम, आवाज, आणि इतर
जबाबदाऱ्या. पण अभ्यासिकेमध्ये शांत वातावरण, अभ्यासासाठी योग्य जागा, आणि एकाग्रता मिळते.
आता तुम्ही क्लास
आणि अभ्यासिका जॉईन केली आहे, म्हणजे तयारीसाठी
सर्व काही तयार आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा – अभ्यासासाठी “टार्गेट” ठेवा. Mahagenco Syllabus Technician 3| अभ्यासक्रम
टार्गेट फक्त एक – नोकरी!
टार्गेट ठेवल्यावर
वेळेचं व्यवस्थापन सुद्धा गरजेचं आहे.
उदाहरणार्थ:
- सकाळी: बुद्धिमत्ता चाचणी
- दुपारी: गणित
- संध्याकाळी: तांत्रिक विषय
या पद्धतीने जर
तुम्ही तयारी केली, तर नक्कीच यश तुमचं होईल.
फक्त सातत्य, सराव आणि आत्मविश्वास हवा!
MAHAGENCO मध्ये 800 जागांची भरती :2024
गणित
१) संख्या
२) मसाचुंद्री (म.स.वी.) आणि लसावि (ल.स.वी.)
३) दशांश अपूर्णांक
४) सरलीकरण
५) वर्ग आणि घनमूळ
६) सरासरी
७) संख्यांवरील समस्या
८) वयांवरील समस्या
९) वाढ आणि निर्देशांक
१०) टक्केवारी
११) नफा आणि तोटा
१२) गुणोत्तर आणि प्रमाण
१३) भागीदारी
१४) साखळी नियम
१५) वेळ आणि काम
१६) पाईप आणि टाक्या
१७) वेळ आणि अंतर
१८) गाड्यांवरील समस्या
१९) बोटी आणि ओढे
२०) साधे आणि चक्रवाढ व्याज
MAHAGENCO मध्ये 800 जागांची भरती :2024
बुद्धिमत्ता चाचणी
1. अल्फान्यूमेरिक
मालिका (Alphanumeric Series)
2. तर्कसंगती (Logical Reasoning)
3. कृत्रिम भाषा (Artificial Language)
4. रक्त संबंध (Blood Relations)
5. कॅलेंडर (Calendar)
6. कारण आणि परिणाम
(Cause and Effect)
7. घड्याळे (Clock Problems)
8. कोडिंग -
डिकोडिंग (Coding - Decoding)
9. गंभीर मार्ग /
दिशा चाचणी
10. घन आणि घनकण (Cubes and Dice)
11. डेटा पर्याप्तता
(Data Sufficiency)
12. निर्णय घेणे (Decision Making)
13. व्युत्पन्न तर्क
/ विधान विश्लेषण (Analytical Reasoning / Statement Analysis)
14. फासे (Dice Problems)
15. दिशानिर्देश (Direction Test)
16. एम्बेड केलेल्या
प्रतिमा (Embedded Figures)
17. आकृती मॅट्रिक्स
(Figure Matrix)
18. इनपुट-आउटपुट (Input - Output)
19. आरसा आणि
पाण्याच्या प्रतिमा
20. विषम एक आउट (Odd One Out)
21. चित्र मालिका आणि
अनुक्रम (Picture Series and Sequence)
22. कागद घडी (Paper Folding &
Cutting)
23. कोडी (Puzzles)
24. नमुना मालिका आणि
अनुक्रम (Number & Pattern Series)
25. क्रम आणि रँकिंग
(Order and Ranking)
26. आसन व्यवस्था (Seating Arrangement)
27. आकार रचना (Shape Construction /
Image Construction)
28. विधान आणि
गृहीतके (Statement and Assumptions)
29. विधान आणि
निष्कर्ष (Statement and Conclusions)
30. शब्दरचना (Word Formation)
✅ थोडक्यात
टिप्स:
- अभ्यासक्रम समजून घ्या
- टाइम टेबल तयार करा
- दिवसाचे विशिष्ट तास अभ्यासासाठी राखा
- गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीवर भर द्या
- क्लास किंवा मार्गदर्शन मिळत असेल,
तर घ्या
- आठवड्याला एकदा Mock Test द्या
- स्वतःवर विश्वास ठेवा
·
तयारी सुरू ठेवा,
सराव करत रहा आणि
नोकरी आपल्या हातात नक्की येईल!
·
जय महाराष्ट्र!
टिप्पण्यांमध्ये अशुद्ध माहिती टाकू नका.