ITI Admission 2025 Maharashtra​ | ऍडमिशन

 ITI Admission 2025 Maharashtra : प्रवेश सूचना 


  • ऑगस्ट २०२५ सत्रासाठी महाराष्ट्रातील शासकीय खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली  आहे. खालील माहिती तुमच्या उपयोगासाठी दिली आहे:

  • राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांना कळविण्यात येते की, प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक शासकीय व खाजगी औ.प्र. संस्थांमध्ये दि. १५ मे २०२५ पासून दररोज सकाळी १०.०० ते ११.०० या वेळेत निःशुल्क मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे.
  • जर प्रवेश प्रक्रिया, नियमावली, अथवा संकेतस्थळ वापरण्यासंबंधी कोणतेही प्रश्न किंवा अडचणी असतील, तर आपण आपल्या नजीकच्या शासकीय किंवा खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेशी संपर्क साधावा.
  • ITI मध्ये प्रवेश घेण्याआधी सर्वात महत्त्वाचं म्हणजे – आपल्याला कोणता ट्रेड (व्यवसाय) करायचा आहे हे ठरवा!
  • एकदा तुम्ही ITI मध्ये प्रवेश घेतल्यावर ट्रेड बदलता येत नाही, त्यामुळे योग्य माहिती घेऊन आणि विचार करूनच फॉर्म भरा.

  •  ITI केल्यानंतर महाजेनको, महावितरण, रेल्वे, BSNL, DRDO अशा अनेक शासकीय आणि खासगी संस्थांमध्ये नोकरीची उत्तम संधी मिळते.

टीप: मार्गदर्शन सत्र पूर्णपणे निःशुल्क असून, यामध्ये सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक नाही.

ITI Admission 2025 Maharashtra

ITI प्रवेश प्रक्रिया महत्त्वाच्या तारखा:

  • नोंदणी सुरू होण्याची तारीख: २ जून २०२५
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: ३० जून २०२५
  • प्रवेश अर्जातील माहिती बदलण्याची अंतिम तारीख: ५ जुलै २०२५
  • प्रवेशाची अंतिम तारीख: २० ऑगस्ट २०२५


ITI प्रवेश साठी लागणारे दस्तऐवज:

  • SSC  गुणपत्र 
  • डोमेसाइल 
  • पासपोर्ट साईझ फोटो 
  • आधार कार्ड 
  • कास्ट 
  • इतर लागणारे कागदपत्रे 



 अर्ज भरण्याची पद्धत

अधिकृत वेबसाइटला भेट द्या: ITI प्रवेशासाठी अधिकृत वेबसाइट admission.dvet.gov.in वर जा.

नवीन उमेदवारांसाठी नोंदणी :

"New Candidate Registration" या पर्यायावर क्लिक करा.

आपले वैयक्तिक माहिती,स्वतःचे नाव,  ईमेल, मोबाईल नंबर, पासवर्ड इत्यादी भरा.

नोंदणी पूर्ण केल्यानंतर, आपल्याला एक रजिस्ट्रेशन नंबर मिळेल.


रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा.

शैक्षणिक पात्रता, पत्ता, जात प्रमाणपत्र (लागू असल्यास), आधार कार्ड, फोटो आणि सही यांसारखी आवश्यक माहिती भरा.

कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.

अर्ज सबमिट करा.

अर्ज शुल्क भरणे:

सामान्य प्रवर्गासाठी ₹150, मागासवर्गीयांसाठी ₹100, इतरांसाठी ₹300 शुल्क आकारले जाते.

ऑनलाइन माध्यमातून (डेबिट/क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI) शुल्क भरा.


अर्जाची पुष्टीकरण:

अर्ज सबमिट केल्यानंतर, अर्जाची पुष्टीकरण पावती डाउनलोड करा आणि सुरक्षित ठेवा.




संपर्कासाठी:
📍 आपल्या जवळील शासकीय/खाजगी औ.प्र. संस्था
🌐 अधिक माहिती: https://dvet.gov.in     





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

author sectoin