1. Kalyan Dombivli Municipal Bharti 2025|संपूर्ण माहित
- मित्रांनो, एक आनंदाची बातमी! कल्याण डोंबिवली महानगर पालिकेत (KDMC) विविध पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती तब्बल ४९० रिक्त पदांसाठी होणार असून, अनेक पात्र उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांना महानगरपालिकेत नोकरी करण्याची इच्छा आहे, त्यांनी या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज लवकरात लवकर भरावा.
- या भरतीमध्ये विविध पदांचा समावेश असून, त्यामध्ये स्वच्छता कर्मचारी, अग्निशमन दल कर्मचारी, वाहन चालक, वैद्यकीय अधिकारी, नर्स, फार्मासिस्ट, लिपिक, आणि इतर तांत्रिक व अतांत्रिक पदांचा समावेश आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपली शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व अनुभव तपासूनच अर्ज भरावा.
- भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येत असून, उमेदवारांनी महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपला फॉर्म काळजीपूर्वक भरायचा आहे. अर्ज करताना उमेदवारांनी आपल्या सर्व वैयक्तिक माहितीची योग्य तपासणी करूनच फॉर्म सबमिट करावा. अर्जामध्ये कोणतीही खाडाखोड किंवा चुका झाल्यास पुढे त्या दुरुस्त करता येणार नाहीत, तसेच चुकीच्या माहितीमुळे उमेदवार अपात्र ठरू शकतो. त्यामुळे अर्ज भरताना काळजी घेणे गरजेचे आहे.
- तसेच, अर्जासोबत लागणारे सर्व आवश्यक कागदपत्रे — जसे की शैक्षणिक प्रमाणपत्र, ओळखपत्र, अनुभव प्रमाणपत्र (असल्यास), जात प्रमाणपत्र, व वयोमर्यादेचा पुरावा — ही स्कॅन करून योग्य स्वरूपात अपलोड करणे आवश्यक आहे.
- Indian Coast Guard GD Bharti 2025। भारतीय तटरक्षक भरती
- Supreme Court New Bharti 2025| सुप्रिम कोर्ट प्रोग्रामर भरती
- भरतीची सविस्तर जाहिरात व मार्गदर्शक सूचना महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारांनी भरतीची सर्व अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचाव्यात. तसेच, मैदानी चाचणी, लेखी परीक्षा किंवा मुलाखत याबाबतची माहिती भरती प्रक्रियेनंतर अधिकृतपणे कळविण्यात येईल.
- ही एक चांगली सरकारी नोकरीची संधी असल्याने, पात्र उमेदवारांनी ती नक्कीच हेरावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख लक्षात ठेवून आपली प्रक्रिया वेळेत पूर्ण करा.
- सर्व उमेदवारांना पुढील भरती प्रक्रियेसाठी खूप खूप शुभेच्छा!
2. Kalyan Dombivali Mahanagarpalika Vacancy
पदाचे नाव | रिक्त जागा |
---|---|
फिजीओथेरपीस्ट [Physiotherapist] | 02 |
औषधनिर्माता [Drug Manufacturer] | 14 |
कुष्ठरोग तंत्रज्ञ [Leprosy Technician] | 02 |
स्टाफ नर्स [Staff Nurse] | 78 |
हेल्थ व्हिजीटर अँड लेप्रसी अँड टेक्नीशियन | 01 |
मानस उपचार समुपदेशक [Psychological Counselor] | 02 |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ [Laboratory Technician] | 01 |
क्ष-किरण तंत्रज्ञ [X-Ray Technician] | 06 |
लेखापाल [Accountant] | 06 |
कनिष्ठ अभियंता (विद्युत) [Junior Engineer (Electrical)] | 12 |
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) [Junior Engineer (Mechanical)] | 08 |
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) [Junior Engineer (Civil)] | 58 |
चालक यंत्रचालक (ड्रायव्हर कम ऑपरेटर) | 12 |
अग्निशामक (फायरमन) [Fireman] | 138 |
कनिष्ठ विधी अधिकारी [Junior Legal Officer] | 02 |
क्रीडा पर्यवेक्षक [Sports Supervisor] | 01 |
उद्यान अधिक्षक [Park Superintendent] | 02 |
उद्यान निरीक्षक [Park Inspector] | 11 |
लिपीक-टंकलेखक [Clerk-Typist] | 116 |
लेखा लिपीक [Account Clerk] | 16 |
आया (फिमेल अटेंन्डंट) [Nanny (Female Attendant)] | 02 |
TOTAL | 490 |
3. Kalyan Dombivali Mahanagarpalika Qualification
पदाचे नाव: फिजीओथेरपीस्ट [Physiotherapist]
शैक्षणिक पात्रता:
- मान्यताप्राप्त विद्यापीठाची M.P.T.H (फिजिओथेरपी व रिहॅबिलिटेशन) पदवी, उपलब्ध नसल्यास संबंधित पदवीधारक, तसेच २ वर्षांचा अनुभव आवश्यक.
पदाचे नाव: औषधनिर्माता [Drug Manufacturer]
शैक्षणिक पात्रता:
- मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी. फार्म पदवी, महाराष्ट्र फार्मसी कॉन्सिलचे वैध नोंदणी प्रमाणपत्र आणि संबंधित क्षेत्रातील २ वर्षांचा अनुभव आवश्यक.
पदाचे नाव: कुष्ठरोग तंत्रज्ञ [Leprosy Technician]
शैक्षणिक पात्रता:
- १२वी उत्तीर्ण, पॅरामेडिकल लेप्रसी टेक्निशियन कोर्स केलेला आणि संबंधित क्षेत्रात २ वर्षांचा अनुभव असलेला उमेदवार पात्र.
पदाचे नाव: स्टाफ नर्स [Staff Nurse]
शैक्षणिक पात्रता:
- B.Sc (नर्सिंग) किंवा १२वी उत्तीर्ण आणि GNM पात्रता असलेला, तसेच संबंधित कामाचा किमान २ वर्षांचा अनुभव असलेला उमेदवार पात्र.
पदाचे नाव:हेल्थ व्हिजीटर अँड लेप्रसी अँड टेक्नीशियन
शैक्षणिक पात्रता:
- 10वी उत्तीर्ण आणि कुष्ठरोग तंत्रज्ञ कोर्स पूर्ण केलेला उमेदवार पात्र.
पदाचे नाव: मानस उपचार समुपदेशक [Psychological Counselor]
शैक्षणिक पात्रता:
- MA (क्लिनिकल सायकोलॉजी / काउन्सेलिंग सायकोलॉजी) पदवी आणि संबंधित क्षेत्रात 2 वर्षांचा अनुभव आवश्यक.
पदाचे नाव: प्रयोगशाळा तंत्रज्ञ [Laboratory Technician]
शैक्षणिक पात्रता:
- B.Sc (फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, बॉटनी, झूलॉजी किंवा मायक्रोबायोलॉजी) पदवीधारक, DMLT उत्तीर्ण आणि संबंधित क्षेत्रातील 2 वर्षांचा अनुभव असलेला उमेदवार पात्र.
पदाचे नाव: क्ष-किरण तंत्रज्ञ [X-Ray Technician]
शैक्षणिक पात्रता:
- B.Sc (फिजिक्स) पदवी, रेडिओग्राफी डिप्लोमा आणि संबंधित क्षेत्रात 2 वर्षांचा अनुभव आवश्यक.
पदाचे नाव: लेखापाल [Accountant ]
शैक्षणिक पात्रता:
- B.Com पदवी आणि संबंधित क्षेत्रात 3 वर्षांचा अनुभव आवश्यक.
पदाचे नाव: कनिष्ठ अभियंता (विद्युत) [Junior Engineer (Electrical)]
शैक्षणिक पात्रता:
- इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदवीधारक उमेदवार पात्र.
पदाचे नाव: कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) [Junior Engineer (Mechanical)]
शैक्षणिक पात्रता:
- मेकॅनिकल अभियांत्रिकी पदवीधारक उमेदवार पात्र.
पदाचे नाव: कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) [Junior Engineer (Civil)]
शैक्षणिक पात्रता:
- सिव्हिल अभियांत्रिकी शाखेची पदवीधर उमेदवार पात्र.
पदाचे नाव: चालक यंत्रचालक (ड्रायव्हर कम ऑपरेटर)
शैक्षणिक पात्रता:
- 10वी उत्तीर्ण, 6 महिन्यांचा अग्निशमन कोर्स केलेला, 3 वर्षांचा अनुभव आणि वैध जड वाहनचालक परवाना असलेला उमेदवार पात्र.
पदाचे नाव: अग्निशामक (फायरमन) [Fireman]
शैक्षणिक पात्रता:
- 10वी उत्तीर्ण व 6 महिन्यांचा अग्निशमन कोर्स पूर्ण केलेला उमेदवार आवश्यक.
पदाचे नाव: कनिष्ठ विधी अधिकारी [Junior Legal Officer]
शैक्षणिक पात्रता:
- विधी पदवीधारक आणि संबंधित क्षेत्रातील किमान 3 वर्षांचा अनुभव असलेला उमेदवार पात्र.
पदाचे नाव: क्रीडा पर्यवेक्षक [Sports Supervisor]
शैक्षणिक पात्रता:
- कोणत्याही शाखेची पदवी, BPEd, SAI मान्यताप्राप्त डिप्लोमा आणि संबंधित क्षेत्रात किमान 3 वर्षांचा अनुभव असलेला उमेदवार पात्र.
पदाचे नाव: उद्यान अधिक्षक [Park Superintendent]
शैक्षणिक पात्रता:
- B.Sc (हॉर्टिकल्चर) किंवा कृषी, बॉटनी, फॉरेस्ट्री किंवा वनस्पतीशास्त्र पदवीधारक, तसेच संबंधित कामाचा किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक.
पदाचे नाव: उद्यान निरीक्षक [Park Inspector]
शैक्षणिक पात्रता:
- हॉर्टिकल्चर, कृषी, बॉटनी, फॉरेस्ट्री किंवा वनस्पतीशास्त्र विषयातील B.Sc पदवीधारक उमेदवार पात्र.
पदाचे नाव: लिपीक-टंकलेखक [Clerk-Typist]
शैक्षणिक पात्रता:
- कोणत्याही शाखेतील पदवीधारक आणि संगणकावर मराठी 30 व इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट वेगाने टंकलेखन असणे आवश्यक
पदाचे नाव: लेखा लिपीक [Account Clerk]
शैक्षणिक पात्रता:
- B.Com पदवी आणि संगणकावर मराठी 30 व इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट टायपिंगचा वेग असणे आवश्यक.
पदाचे नाव: आया (फिमेल अटेंन्डंट) [Nanny (Female Attendant)]
शैक्षणिक पात्रता:
- 10वी उत्तीर्ण आणि शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा मान्यवर ट्रस्टच्या रुग्णालयात किंवा किमान 50 बेड असलेल्या खाजगी रुग्णालयात संबंधित कामाचा किमान 2 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक.
4. Kalyan Dombivali Mahanagarpalika Age Limit 2025
श्रेणी | वयोमर्यादा |
---|---|
सामान्य (Open) | 18 ते 38 |
ओबीसी (OBC) | 18 ते 41 |
एससी / एसटी (SC/ST) | 18 ते 43 |
अपंगत्व व्यक्ती (PwBD) | 18 ते 45 |
4.1 Kalyan Dombivali Mahanagarpalika Exam Fees 2025
श्रेणी | परीक्षा शुल्क |
---|---|
खुला प्रवर्ग | ₹1000/- GST |
मागास प्रवर्ग व अनाथ प्रवर्ग | ₹ 900/- GST |
4.2 KDMC Mahanagarpalika Last Date to Apply
🔹अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : 10/06/2025🔹अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 03/07/2025
🔹शुल्क भरण्याची अंतिम तारीख : 03/07/2025
🔹परीक्षेची प्राथमिक तारीख : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या संकेत स्थळावर उपलब्ध असेल.
4.3 अग्निशमन सेवा मैदानी चाचणी निकष
१६०० मीटर धावणे |
|
||
---|---|---|---|
५ मि. १० सेकंद किंवा त्यापेक्षा कमी | 30 | ||
५ मि. १० सेकंदापेक्षा जास्त पण ५ मि. ३० सेकंद किंवा त्यापेक्षा कमी | 27 | ||
५ मि. ३० सेकंदापेक्षा जास्त पण ५ मि. ५० सेकंद किंवा त्यापेक्षा कमी | 24 | ||
५ मि. ५० सेकंदापेक्षा जास्त पण ६ मि. १० सेकंद किंवा त्यापेक्षा कमी | 21 | ||
६ मि. १० सेकंदापेक्षा जास्त पण ६ मि. ३० सेकंद किंवा त्यापेक्षा कमी | 18 | ||
६ मि. ३० सेकंदापेक्षा जास्त पण ६ मि. ५० सेकंद किंवा त्यापेक्षा कमी | 15 | ||
६ मि. ५० सेकंदापेक्षा जास्त पण ७ मि. १० सेकंद किंवा त्यापेक्षा कमी | 10 | ||
७ मि. १० सेकंदापेक्षा जास्त पण ७ मि. ३० सेकंदापेक्षा कमी | 05 | ||
७ मि. ३० सेकंदापेक्षा जास्त | 00 |
5. KDMC Mahanagarpalika Documents Required
क्र. क्र. | कागदपत्र |
---|---|
1 | 10वी | SSC |
2 | 10वी | SSC |
3 | 12वी | HSC |
4 | 12वी | HSC |
5 | B.Sc / B.com पदवी असल्यास, चारही वर्षाचे मार्कशीट गुणपत्रक |
6 | M.A. पदव्युत्तर पदवी |
7 | Marathi Typing 30 W.P.M | English Typing 40 W.P.M डिप्लोमा असल्यास, त्याचे गुणपत्रक |
8 | शाळा सोडल्याचा दाखला | TC |
9 | अधिवास प्रमाणपत्र | Domicile |
10 | जातीचे प्रमाणपत्र | Cast |
11 | नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र |
12 | कोणतेही दोन ओळख पत्र : आधार कार्ड / ड्रायविंग लायसन्स |
13 | पासपोर्ट साईझ कलर फोटो |
14 | सही |
15 | ई-मेल आयडी |
16 | मोबाईल नंबर |
17 | ओ.बी.सी. प्रमाणपत्र |
5.1 KDMC Mahanagarpalika Apply Online Links
संदर्भ | लिंक |
---|---|
• NOTIFICATION | KDMC Notification 2025 |
• APPLICATION | KDMC Application Form 2025 |
• WEBSITE | KDMC Official Website |
टिप्पण्यांमध्ये अशुद्ध माहिती टाकू नका.