1. RRB Technician Recruitment 2025 | महत्वाची माहिती
- मित्रांनो, रेल्वे भरती बोर्डामार्फत (RRB) टेक्निशियन पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती देशभरातील उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. एकूण 6180 जागा या भरती अंतर्गत भरल्या जाणार आहेत. त्यामुळे ज्यांना रेल्वेमध्ये नोकरी करण्याची इच्छा आहे, त्यांनी ही संधी गमावू नये.
- या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे. पात्र उमेदवारांनी वेळेवर आपले अर्ज भरून घ्यावेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख आणि अधिकृत वेबसाइट लवकरच जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे अधिकृत वेबसाईटवर वेळोवेळी भेट देऊन माहिती तपासावी.
- या भरतीमध्ये टेक्निशियन ग्रेड-I सिग्नल आणि टेक्निशियन ग्रेड-III अशा पदांचा समावेश आहे. या पदांसाठी उमेदवारांकडे ITI किंवा संबंधित ट्रेडमधील पात्रता आवश्यक आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांकडे आवश्यक शैक्षणिक पात्रता आहे, त्यांनीच अर्ज करावा. ज्या उमेदवारांकडे आवश्यक पात्रता नसेल त्यांनी अर्ज करणे टाळावे.
- रेल्वेमध्ये नोकरी करण्याची ही मोठी संधी आहे. स्थिर आणि प्रतिष्ठित नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच भरतीशी संबंधित तपशील, परीक्षा पद्धती, सिलेक्शन प्रक्रिया आणि अभ्यासक्रम यांची माहिती अधिकृत वेबसाईटवरून घ्यावी.
2. RRB Technician Bharti 2025 | थोडक्यात माहिती
📌 टेक्निशियन ग्रेड I (सिग्नल):
➡️ रेल्वेच्या सिग्नल आणि टेलिकम्युनिकेशन विभागात काम करणारा तंत्रज्ञ.
➡️ सिग्नल यंत्रणा, वायरिंग, इंटरलॉकिंग सिस्टिम आणि नेटवर्क मेटेनन्सची जबाबदारी.
➡️ ITI (संबंधित ट्रेड) पास असणं आवश्यक.
रेल्वे सिग्नल आणि कम्युनिकेशन यंत्रणा हाताळणारा टेक्निशियन, वायरिंग आणि इंटरलॉकिंग सिस्टिमचं देखभाल करतो.
📌 टेक्निशियन ग्रेड III:
➡️ रेल्वेच्या विविध तांत्रिक विभागात (इलेक्ट्रिकल, फिटर, मशीनिस्ट, सिग्नल इत्यादी) मदतीचं काम.
➡️ यंत्रसामग्रीचं मेंटेनन्स, रिपेअरिंग आणि इन्स्टॉलेशन करतो.
➡️ ITI (संबंधित ट्रेड) पास असणं आवश्यक.
रेल्वेतील विविध तांत्रिक विभागात यंत्रसामग्रीची देखभाल आणि दुरुस्ती करणारा टेक्निशियन.
3.RRB Technician Vacancy 2025
पदाचे नाव | रिक्त जागा |
---|---|
Technician Grade I (Signal): तंत्रज्ञ ग्रेड I (सिग्नल) | 180 |
Technician Grade III: तंत्रज्ञ ग्रेड III | 6000 |
3.1RRB Technician Eligibility Criteria
पदाचे नाव: Technician Gr I (Signal): तंत्रज्ञ ग्रेड I (सिग्नल)
शैक्षणिक पात्रता:
- या पदासाठी उमेदवाराने B.Sc (फिजिक्स / इलेक्ट्रॉनिक्स / कॉम्प्युटर सायन्स / IT / इंस्ट्रुमेंटेशन) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण केलेला असावा. संबंधित शाखेतील उमेदवारांना अर्ज करता येईल.
पदाचे नाव: Technician Grade III: तंत्रज्ञ ग्रेड III
शैक्षणिक पात्रता:
या पदासाठी उमेदवाराने:
(i) किमान १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
(ii) तसेच संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. खालील ट्रेड्सपैकी कोणत्याही एकामध्ये ITI उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकतात:ट्रेड्स: ITI मधील सर्व ट्रेड
(HT, LT Equipments and Cable Jointing), Operator Advanced Machine Tool, Machinist, Machinist (Grinder), Refrigeration and Air Conditioning Mechanic, Instrument Mechanic, Mechanic Mechatronics, Turner, Welder (Gas and Electric), Gas Cutter, Welder (Structural), Welder (Pipe), Welder (TIG/MIG)
3.2 RRB Technician Age Limit 2025
श्रेणी | वयोमर्यादा |
---|---|
सामान्य (Open) | 18 ते 33 |
ओबीसी (OBC) | 18 ते 36 |
एससी / एसटी (SC/ST) | 18 ते 38 |
अपंगत्व व्यक्ती (PwBD) | 18 ते 43 |
4. RRB Exam Fees 2025
श्रेणी | परीक्षा शुल्क |
---|---|
OPEN/OBC/EWS | ₹750/- GST |
SC/ST/PwBD | परीक्षा फीस नाही |
4.1 RRB Technician 2025 Last Date to Apply
🔹अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : 28/06/2025🔹अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 28/07/2025
🔹शुल्क भरण्याची अंतिम तारीख : 28/07/2025
🔹परीक्षेची प्राथमिक तारीख : नंतर कळवण्यात येइल
4.2 RRB Technician Documents Required
क्र. क्र. | कागदपत्र |
---|---|
1 | 10वी गुणपत्रक |
2 | 10वी बोर्ड प्रमाणपत्र |
3 | 12वी गुणपत्रक |
4 | 12वी बोर्ड प्रमाणपत्र |
5 | ITI डिप्लोमा, त्याचे गुणपत्रक |
6 | शाळा सोडल्याचा दाखला |
7 | आधार कार्ड/ पॅन कार्ड/ मतदान कार्ड |
8 | पासपोर्ट साईझ कलर फोटो |
9 | सही |
10 | ई-मेल आयडी |
11 | मोबाईल नंबर |
12 | ओ.बी.सी. प्रमाणपत्र |
4.3 RRB Technician Apply Online Links
संदर्भ | लिंक |
---|---|
• NOTIFICATION | RRB Technician Notification 2025 |
• APPLICATION | RRB Technicain Application Form 2025 |
• WEBSITE | RRB Official Website |
टिप्पण्यांमध्ये अशुद्ध माहिती टाकू नका.